राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ खेळाडू मुलींची निवड

बातमी शेअर करा...

राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ खेळाडू मुलींची निवड.

जळगांव – येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२वीच्या अर्शिया आरिफ तडवी, स्वाती रामबहादुर गुप्ता, दिव्या विशाल लिंगायत, संपदा मनीष कुलकर्णी या चार खेळाडू मुलींची राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सदर स्पर्धा दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे,प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे, उपप्राचार्य प्रा.आर.बी. ठाकरे,पर्यवेक्षक प्रा.स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील, जिमखाना समिती चेअरमन प्रा.महेंद्र राठोड यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम