
राज्यात आता विरोधक शिल्लक नाही ; त्यांनी पाच वर्ष आराम करावा
गिरीश महाजन यांचा जामनेरात विरोधकांवर टोला
राज्यात आता विरोधक शिल्लक नाही ; त्यांनी पाच वर्ष आराम करावा
गिरीश महाजन यांचा जामनेरात विरोधकांवर टोला
जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्य राज्याला ठावू आहे. धूळवडच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना थेट टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात आता विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत. जे शिल्लक राहिले आहेत, त्यांना पाच वर्षे आराम करावा.”
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या महिला पदाधिकार्याच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी आरोप केला होता की, पोलिस आरोपींना संरक्षण देत आहेत. यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिले की, “आरोपींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, हेच आमचे पहिल्यापासून मत आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपात काहीही तथ्य नाही.”
धूलिवंदनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले, “सर्व तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे.” यासोबतच, त्यांनी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला.
गिरीश महाजन यांनी विधानसभेतील भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशाबद्दल चर्चा करतांना सांगितले की, “राज्यात सध्या विरोधक शिल्लक नाहीत. जे थोडेफार शिल्लक आहेत, त्यांनी पाच वर्षे आराम करावा. त्यांच्याकडे काही चांगल्या सूचना असल्यास त्यांनी त्या सरकारला सुचवाव्यात.”
या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तणावपूर्ण झाले आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना थेट उत्तर देत विरोधकांना इशारा दिला आहे, तर खडसे यांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या आरोप-प्रत्यारोपात कोणाचा विजय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम