राज्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ठरले सर्वोत्कृष्ट

बातमी शेअर करा...

राज्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ठरले सर्वोत्कृष्ट
जळगाव राज्य शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमाच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात अव्वल स्थान पटकावत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालयाचा मान मिळवला आहे.

या यशामध्ये जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी मिलिंद बुवा व उपायुक्त महेश पत्की यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. विविध शासकीय निर्देशांकांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून जळगाव जिल्ह्याने आपली भक्कम छाप उमटवली आहे. राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना कार्यक्षमता, पारदर्शकता, योजनांची अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकाभिमुख प्रशासन या बाबींचा विचार करण्यात आला. या सर्वच निकषांमध्ये जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम