राज्यात राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी मोहीम सुरू

बालकल्याण विभागाच्या सहकार्याने आरोग्य पथके कार्यरत

बातमी शेअर करा...

राज्यात राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी मोहीम सुरू
बालकल्याण विभागाच्या सहकार्याने आरोग्य पथके कार्यरत
जळगांव प्रतिनिधी
राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांचे आरोग्य तपासले जात असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभाग व महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने आरोग्य पथके कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ, जळगाव, पारोळा, चोपडा यासह १५ तालुक्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या मोहिमेत जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य सेवक, बालरोग तज्ज्ञ, व आशा कार्यकर्त्या सहभागी होत आहेत.

या उपक्रमांतर्गत मुलांच्या पोषण स्थितीचे मूल्यमापन, सामान्य आजारांचे निदान, तसेच गंभीर आजारांवर मोफत उपचार आणि पुढील वैद्यकीय मदतीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्य पथक कार्यरत असून, त्यांना आवश्यकतेनुसार तातडीने उपचार मिळतील, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे मोफत आरोग्य तपासणीसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम