
राज्यात विकासकामांना गती : ११४७ कोटींच्या कामांना मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी
राज्यात विकासकामांना गती : ११४७ कोटींच्या कामांना मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी
मुंबई : राज्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीला चालना देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ११४७ कोटी ७३ लाख ७८ हजार रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या मंजूर कामांमध्ये पुढीलप्रमाणे खर्चाचा समावेश आहे :
नगरविकास विभागाअंतर्गत १६ कामे — ७४८ कोटी रुपये
नगरपरिषदांसाठी २९ कामे — २१६ कोटी रुपये
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत १३२ कामे — १८३ कोटी ७३ लाख ७८ हजार रुपये
फडणवीस म्हणाले, “ही कामे लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवतील. नागरी सुविधांमध्ये वाढ होईल आणि रोजगारालाही चालना मिळेल.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम