राज्य लोकसेवा हक्क आयोग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा जिल्हा दौरा उत्साहात
अधिसूचित लोकसेवा पुरविणाऱ्या कार्यालयाची तपासणी
जळगांव – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी आयुक्त चित्रा कुलकर्णी राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग नाशिक यांचा दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौरा आयोजित झालेला होता.
या दौऱ्या दरम्यान या अधिसूचित लोकसेवा पुरविणाऱ्या कार्यालयाचे तपासणीचा भाग म्हणून आयोगाने प्रभाग समिती क्रमांक १ चे कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
तदनंतर दुपारी ४ वाजता मनपा सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी श्रीमती चित्र कुलकर्णी आयुक्त लोकसेवा हक्क आयोग यांचे श्रीमती पल्लवी भागवत अतिरिक्त यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच उदय कानव्व कक्ष अधिकारी यांचे स्वागत श्रीयुत अविनाश गांगोडे उपायुक्त यांनी केले व श्रीयुत प्रशांत घोडके सहाय्यक कक्षा अधिकारी यांचे स्वागत श्रीयुत अभिजीत बाविस्कर यांनी केले.
यावेळी मा. आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी मॅडम यांनी मनपाचे सदर अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त करून निर्देश दिले की, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा नागरिकांना वेळेत द्यावी.
या अधिनियमान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना विहित कालावधीमध्ये लोकसेवा पुरवण्याची तरतूद करण्यात आली असल्याने त्यासाठी नागरिकांना अधिसूचित सेवा विहित कालावधीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.
प्रत्येक कार्यालयात सेवा हमी कायद्याच्या अधिसूचित सेवांची सूची दर्शनी भागावर प्रदर्शित करावी त्यात पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी,अपील अधिकारी यांचे नाव निर्देशित केलेले असावेत.
लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा डॅशबोर्डवर आलेल्या अर्जांची व अपिलांची पडताळणी करावी.
सेवा हमी देणाऱ्या विभागांनी प्रलंबित प्रकरणांचा तसेच अपील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात यावा. सेवा हमी कायद्याची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी.
सेवा देणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने एखाद्या सेवेसाठी जास्त कालावधी लागत असल्यास अशा सेवेच्या मुदत वाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश यावेळी श्रीमती चित्रा कुलकर्णी मॅडम आयुक्त लोकसेवा हक्क आयोग यांनी दिले.
लोकसेवा हक्क अधिनियमान्वये सेवा देणाऱ्यांची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यात यावी. दर आठवड्याला अधिकाऱ्यांनी लॉगिन करून डॅशबोर्ड बघावे.
दर महिन्याची अ ब क प्र पत्राची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात यावी. सर्व कार्यालयांनी त्यांच्या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांची आणि काल मर्यादेची सरकार पोर्टल संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास वेळ व पैसा यांचा अपव्यय न होता विनासायास, ठराविक मुदतीत सेवा मिळण्याचा हक्क या कायद्याने नागरिकांना दिला आहे.
या कायद्यांतर्गत संबंधित कार्यालयाशी संपर्क घरबसल्या मधून नागरिक सेवा घेऊ शकतात.शासनाच्या नगरविकास विभागामार्फत सेवा हक्क कायद्याअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रकारिता अधिसूचित शेवपैकी जळगाव महानगरपालिकेत ५९ सेवा अधिसूचित केलेल्या आहेत.
या सेवा जन्म मृत्यू विवाह नोंदणी, पाणी पुरवठा,मालमत्ता कर संकलन, अग्निशमन व आपत्कालीन विभाग, अभिलेख विभाग, सार्व. स्वच्छता विभाग, व प्रभाग समिती कार्यालये नगर रचना विभाग, ग्रंथालय यांचेमार्फत या सुविधा देणेत येतात.
नागरिकांना विहित मुदतीत सेवा प्राप्त न झाल्यास सेवा हक्क कायद्याअंतर्गत प्रथम वं द्वितीय अपील दखल करू शकतात तसेच नाशिक येथील आयोगाचे कार्यालयात तृतीय अपील दखल करू शकतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चाटे सहाय्यक आयुक्त जळगाव मनपा यांनी केले व कार्यक्रमाचा समारोप श्रीमती निर्मला गायकवाड उपायुक्त यांनी सर्वांचे आभार मानून केले.
सदरील आढावा बैठकीचे वेळी मान्यवर अधिकारी व सर्व विभाग प्रमुख तसेच सेवा पुरवणारे पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा👇
रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या नावे विमा लुटणारी टोळी; शासकीय यंत्रणेची डोळेझाक
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम