रात्रगस्तीत पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; अवैध पिस्तुलांसह चौघे जेरबंद!

बातमी शेअर करा...

रात्रगस्तीत पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; अवैध पिस्तुलांसह चौघे जेरबंद!

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. 11 सप्टेंबर) पहाटे मोठी कारवाई करत गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे व मॅगझिनसह चौघा आरोपींना जेरबंद केले. ही कारवाई गेंदालाल मिल परिसरातील सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी असे –युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (33, रा. गेंदालाल मिल) ,निजामोददीन शेख हुसेनोददीन शेख (31, रा. आझाद नगर) ,शोएब अब्दुल सईद शेख (29, रा. गेंदालाल मिल) , सौहिल शेख उर्फ दया सीआयडी युसुफ शेख (29, रा. शाहूनगर)

गुप्त माहितीवरून गुन्हे शोध पथकाने संशयित कार अडवून चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी टाळाटाळ केली; मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी शस्त्र जवळ असल्याची कबुली दिली. अंगझडती व कार तपासणीदरम्यान – युनुस पटेल याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ जिवंत राउंड कारमधून आणखी १ पिस्तुल, ६ राउंड, १ मॅगझिन , मारुती सुझुकी कार (MH-43 AR-9678)
असा तब्बल ₹1 लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रणय पवार यांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि शहर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम