रायसोनीत फ्रेशर्सचा जल्लोष; ‘इंडो–वेस्टर्न’ स्टाईलमध्ये मिस्टर–मिस फ्रेशरची निवड

बातमी शेअर करा...

रायसोनीत फ्रेशर्सचा जल्लोष; ‘इंडो–वेस्टर्न’ स्टाईलमध्ये मिस्टर–मिस फ्रेशरची निवड

संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगाव शहरालगत असलेल्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीए व बीबीए विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उत्साहात ‘फ्रेशर्स पार्टी’चे आयोजन करण्यात आले. कॉलेज लाईफची नवी सुरुवात करताना विद्यार्थी सीनिअर्सशी ओळख वाढावी आणि महाविद्यालयीन वातावरणात सहज रुळावं, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

फ्रेशर्स पार्टीदरम्यान विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर मनमोकळे नृत्य सादर केले. विविध मजेदार गेम्स, स्वादिष्ट भोजन आणि मनोरंजनातून विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरलेल्या “मिस्टर आणि मिस फ्रेशर” स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. यामध्ये एमबीए विभागातून हेमंत महाजन आणि अश्विनी बिऱ्हाडे, तर बीबीए विभागातून मानव पिंजारी आणि रेवांशी परमेकर यांनी विजेतेपद पटकावले. याशिवाय विविध विशेष पुरस्कारांचाही समावेश करण्यात आला. यात बेस्ट पर्सनालिटी – प्रशांत पाटील, बेस्ट वॉक – सारंग पर्पियानी, बेस्ट स्माईल – सुमन मीना आणि बेस्ट अटायर – क्रीतिका भारंबे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक तसेच उपक्रमात्मक प्रगतीची माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधत म्हटले की, “तुम्ही विद्यार्थी ‘ऑटोनॉमस’ दर्जा प्राप्त असलेल्या प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत आहात. ऑटोनॉमस संस्थेमुळे अभ्यासक्रम आधुनिक गरजांनुसार सतत अद्यतनित केला जातो, परीक्षापद्धती अधिक विद्यार्थीकेंद्रित असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तावर्धनासाठी उत्तम वातावरण उपलब्ध होते.”

यापुढे त्यांनी सांगितले की, “मेहनत आणि सातत्य असेल तर यश अटळ आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि जबाबदारी या गुणांमुळे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवू शकतात. समाजाने विद्यार्थ्यांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सजगपणे प्रयत्न करा. तसेच रायसोनी इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध विद्यार्थीमैत्री उपक्रम राबवते याची माहिती देत त्या म्हणाल्या की, “या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची सीनिअर्स व प्राध्यापकांशी ओळख अधिक दृढ होऊन ते महाविद्यालयाच्या वातावरणात आनंदाने रमतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील आणि बीबीए विभागप्रमुख विशाल राणा हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. श्रेया कोगटा, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. उदीता बिनवाल, प्रा. पूजा चौधरी, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. तन्मय भाले आणि प्रा. मुकेश अहिरराव यांनी उत्तमरित्या पार पाडले. या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी विशेष कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम