बातमीदार | दि ११ जानेवारी २०२४
रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या नावे विमा लुटणारी टोळी; शासकीय यंत्रणेची डोळेझाक
सावदा ता रावेर
रावेर तालुक्यात गेल्या काही वर्षात केळी पीक विम्यात मोठा घोळ झाल्याचे यापूर्वी देखील अनेकदा समोर आले. यात केळी विमा काढून देणारे एजंट ते पास करून देणारे विमा कंपनी अधिकारी,
यासह अनेक लोक यात गुंतले असल्याचा संशय असून देखील याची साधी चौकशी देखील शासन स्तरावर करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.
यामुळे एकप्रकारे या लोकांना अभय देण्याचे काम यंत्रणा करीत असल्याचा संशय निर्माण होत आहे ?
शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्यांवर लवकरच गुन्हे दाखल होणार का ? केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची रक्कम हडप केली जात आहे.
तसेच केळी पीक विमा योजनेत फ्रॉड करणाऱ्या चौकटीने अद्याप अनेकांची फसवणूक केली असून यात शेत जमीन दुसऱ्याचे नावे असतांना सदर चौकडीने विमा परस्पर दुसऱ्याचे नावे काढून विमा लाटण्याचा प्रकार घडले आहेत.
याकडे रावेर तालुक्याचे लक्ष वेधून अशा प्रकारचे वृत्त गेल्या प्रसिद्ध होत असतांना देखील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळीबाबत यंत्रणा गप्प असल्याने या लुटारूंना त्यांचे सहकार्य आहे का..?
याबाबत राजकारणी, सत्ताधारी, समाजसेवक आणि काही संघटना, काही विरोधक शेतकऱ्यांची लूट झाल्याबाबत काहीही बोलत नसल्याने अनेक प्रश्न रावेर तालुक्यात उपस्थित केले जात आहेत.
सन २०२२ व २०२३ या आर्थिक वर्षात केळी पिक विमा मंजूर झाला त्या प्रक्रियेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट करारनामे, बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या उद्योगात यावल – रावेर तालुक्यातील काही संबंधित यांनी बनावट सातबारा उतारे तयार करून
शेतामध्ये केळी पीक प्रत्यक्ष नसताना केळी पिकाची नोंद करून केळी पीक विमा काढणाऱ्या यंत्रणेला सहकार्य केले,
त्यानंतर या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसताना त्यांच्या नावावर केळी पीक विम्याची रक्कम हडप करण्यात आली. तर काही शेतकऱ्यांना केळी पीक विमा मंजूर करण्यासाठी
काही मध्यस्थी दलालांनी मोठमोठ्या आर्थिक रकमा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली.केळी पीक विमा प्रकरणांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर स्टॅम्प वेंडर यांनी
शंभर रुपयाचे स्टॅम्प कोणाच्या नावावर आणि कोणाजवळ दिले आणि कोणाच्या स्वाक्षरीने दिले हा सुद्धा कायदेशीर मुद्दा यावल रावेर तालुक्यात उपस्थित केला जात आहे.
केळी पीक विमा मंजुरीसाठी काही तज्ञ तरुण हे लॅपटॉप घेऊन तालुका भर हिंडत होते आणि आपला उद्देश साध्य करून घेतला आहे इत्यादी अनेक प्रश्न गेल्या वर्षभरात सर्वत्र ठीक ठिकाणी चर्चिले जात असताना
मात्र केळी पीक विमा मंजूर करणाऱ्या टोळींजवळ गेल्या दोन-तीन वर्षात कोट्यावधी रुपयाची माया कोणाच्या आशीर्वादाने आणि ते कोणत्या कार्यक्षेत्रातील आणि कोणाच्या आशीर्वादाखाली दलाल आणि मध्यस्थी आहेत याबाबत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
केळी पिक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाताना कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत संबंधित काही तलाठी, कृषी खात्याशी संबंधित कर्मचारी, काही स्टॅम्प वेंडर, ऑनलाइन काम करणारी यंत्रणा, काही अधिकारी, विमा कंपनीचे एजंट आणि विमा कंपनीशी संपर्कात असणारे मध्यस्थी दलाल कोण कोण सक्रिय होते आणि आहेत..?
आणि शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जेवढी मिळणार आहे त्याच्या निम्मे म्हणजे ५० टक्के रक्कम आधी शेतकऱ्याला रोख स्वरूपात खर्च करावी लागली, आणि ही ५० टक्के रक्कम कोणाच्या सहकार्याने आणि कोणा कोणाच्या आशीर्वादामुळे कोणाकोणामध्ये वाटप झाली.
याबाबत सुद्धा संपूर्ण यावल रावेर तालुक्यात उघडपणे सार्वजनिक ठिकाणी बोलले जात असून समाजात याबाबत आवाज उठविला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत विम्या बाबत फसवणूक झालेले शेतकरी यांनी देखील समोर येऊन आवाज उठवणे आवश्यक असून जेणेकरून अशा विमा लाटणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश होईल अशी अपेक्षा व्यक्त देखील आहे.
हे वाचा👇
सुंदरकांड पठणास भाविकांनी उपस्थिती द्यावी – डॉ अश्विनभाऊ सोनवणे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम