रावेरची ग्रामदेवता पाराच्या गणपतीला 400 वर्षांचा इतिहास
शहरातील मध्यवर्ती भागात आहे मंदिर
रावेर l विजय पाटील
रावेरची ग्रामदेवता – शहरातील मध्यवर्ती असलेल्या नाला भागात पाराचा गणपती मंदिर असून या मंदिराला सुमारे 400 वर्षांपूर्वी पासूनचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. रावेरची ग्रामदेवता
रावेरची ग्रामदेवता सुमारे 400 वर्षांपूर्वी विनायक नारायण उऱ्हेकर हे महान गणेश भक्त होते. त्यांचे कुळदैवत गणपती होते. ते नेहमी आपल्या घरातच गणेश चतुर्थी ला उपवास करून
श्री गणेशाची आराधना करायचे. एका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी त्यांच्या मनात आले कि, आपण चतुर्थीची पूजा श्री गणेशाचे मंदिर स्थापन करावे.
पण कुठे आणि कसे असा विचार करत झोपी गेले. त्याच रात्री श्री गणेश त्यांच्या स्वप्नात येवून म्हणाले कि तुझ्या घरासमोर असलेल्या
पिंपळापासून पश्चिमेकडे 14 पावलांवर असलेली वाळू काढून स्वच्छ कर मी तेथेच आहे व तेथेच पूजा कर. त्यानुसार उऱ्हेकरांनी सकाळी उठून घरासमोर असलेल्या
पिंपळापासून पश्चिमेकडे 14 पावलांवर असलेल्या जागेवरील वाळू काढून जागा स्वच्छ केली असता श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली.
https:https://www.facebook.com/share/r/39xXp3A3pYWBYc4u/?mibextid=an1DBN
तेंव्हापासून त्याठिकाणी पूजा अर्चना सुरु झाली अशी आख्यायिका आहे.
येथील पिंपळाभोवती थोडासा उंचवटा म्हणजेच पार होता त्यावरून या गणपतीला पाराचा गणपती म्हणतात. या पारावर नेहमी लोकांच्या गप्पा रंगत असत.
दिवसांमागून दिवस जात सन 1960 मध्ये काही गणेश भक्तांनी गावकऱ्यांच्या मदतीने व सल्याने या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
सन 1995 ते 1997 यादरम्यान काही गणेश भक्तांनी भरपूर मेहेनतीने व जिद्दीने या मंदिराचा भव्य जिर्णोद्धार करून कायापालट केला.
या मार्गावरून बऱ्हाणपुरकडे मार्गस्थ होतांना छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात दर्शनास येत असत असे अविनाश रावेरकर सांगतात.
हे एक जागृत देवस्थान असून रावेरची ग्रामदेवता आहे. या गणपतीला 1000 मोदकांचा प्रसाद अर्पण करून मोठ्या भक्ती भावाने पूजा केल्यास मनोवांच्छित फळ मिळते
म्हणून याला नवसाला पावणारा गणपतीही म्हणतात. या परिसरातील एका किरणा दुकानदाराला बरीच वर्षे मुलबाळ होत नव्हते.
त्याने श्री गणेशाला 1000 मोदकांचा प्रसाद अर्पण केला व त्यांना अल्पावधीतच मुलगा झाला. असेही रावेरकर सांगतात.
माघ शु. चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थीच्या दिवशी येथे गणेश जयंती साजरी केली जाते.
मध्यंतरी 2 वर्ष यानिमित्त येथे गावातील सर्व लोकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. यानंतर प्रत्येक जयंतीला बुंदीच्या लाडूंचा प्रसाद दिला जातो.
या मंदिराचा सि.स.नं. 885 असून याची धर्मदाय कार्यालयात नोंदणी नाही. हि मूर्ती वाळूची असून त्यावर शेंदराचा लेप आहे.
श्री गणेशाला भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आभूषणे गुप्त दान दिली आहेत. यामध्ये चांदीची छत्री, मुकुट, कान, बाहुबंद, जाणवे, 21 दुर्वांची माळ,
गळ्यातला हार, हातातले कडे, सोंडेवर मुलामा, गंध हि सर्व चांदीची आभूषणे आहेत. मूर्तीच्या बाजूला असलेली लाल फुलांची नक्षी व पुट्टी ही कादर नावाच्या मुस्लीम कारागिराने बनवली आहे.
त्यावरून हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन घडते. पिंपळाच्या झाडावरही श्री गणेशा सारखा आकार निर्माण होवू लागल्याने त्यालाही व्यवस्थित आकार देवून श्री गणेशाची प्रतिकृती निर्माण केली आहे.
आता या मंदिराचे पुजारी म्हणून पंकज तारकास यांची नियुक्ती केली आहे.
मंदिराची देखभाल व कार्यभार संजय वाणी यांचे मार्गदर्शनात होते.
मंदिराच्या काहीही कार्यक्रमासाठी व नवीन विषयांसाठी अविनाश रावेरकर, अनिल अग्रवाल, सोपान तुळसकर, राहुल चौधरी,
मनोज श्रावक, भास्कर पहेलवान, चेतन महाजन, संतोष सोनार, सुधाकर नाईक, प्रशांत श्रावक, नितीन पाटील, संजय ठोंबरे हे सल्लगार असतात.
हे हि वाचा👇
केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्वरित वितरित करा
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम