रावेर|प्रतिनिधी-
वरळी (मुंबई) येथे उभ्या राहत असलेल्या सर्वात उंच इमारतीचे काम करण्याची प्रमुख जबाबदारी रावेर येथील युवकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. संकेत अग्रवाल रिअल इस्टेट क्षेत्रात मित्तल ब्रदर्स या कन्स्ट्रकशन कंपनीत कार्यरत आहे. या काळात अल्पावधीत त्याने कामाचा ठसा उमटवण्यात यश मिळवल्याने, जगभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असलेल्या ट्रेडफ्लॉग कडून संकेत अग्रवाल यांची दखल घेत,त्यांचा गौरव केल्याने,रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
येथील केळी उद्योजक तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांचे चिरंजीव संकेत अग्रवाल सध्या पुणे-मुंबई येथे बांधकाम क्षेत्रात काम करत आहे. मित्तल ब्रदर्स या कंपनीत ते उपाध्यक्ष पदावर असून त्यांनी अल्पावधीत केलेल्या कामाची, बांधकाम व्यवसायिक उद्योगजगतात काम करत असलेल्या लोकांचे मुल्यांकन करत असलेल्या ट्रेडफ्लोग मासिकाकडून दखल घेत त्यांना यशस्वी उद्योजक म्हणून सन्मानित केले आहे. पुण्यातील एमआयटी मधून सिव्हील इंजिनिअरींग व एम टेक उच्च शिक्षण घेतल्यावर संकेत अग्रवाल याने ५ वर्षापासून रिअल इस्टेट या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाने प्रभावित होवून मित्तल ब्रदर्स कंपनीने आपल्या समूहात आणून उपाध्यक्ष पदाची संधी दिली. या काळात त्यांनी कंपनीच्या रेव्हन्यू तसेच साईटवरील कामाची मुदतीपूर्वी पूर्णता, दर्जा वाढवण्याचे काम केल्याने, मित्तल ब्रदर्स कडून वरळी येथील कंपनीच्या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या असो. डीरेक्टर पदावर नेमून या भारतातील सर्वात उंच तयार केल्या इमारतीची मोठी जबाबदारी संकेत अग्रवाल यावर सोपवण्यात आली आहे. एकंदरीत संकेत अग्रवाल यांनी पुणे-मुबई येथे बांधकाम व्यवसायिक क्षेत्रात केलेल्या सुमार कामांमुळे त्यांची घौडदौड होत असून, मुंबई येथे होणारी २९४ मीटर उंचीची इमारत सर्वाधिक उंच रहिवासी इमारत म्हणून गणली जाणार आहे. या प्रोजेक्टची मोठी जबाबदारी संकेत अग्रवाल वर आहे. त्यांनी अनेक अडचणीना बाजूला सारून आता या इमारतीला पूर्ण करण्यासाठी सुरवात केली आहे. मित्तल ब्रदर्स पुण्यात गेल्या ५० वर्षापासून या क्षेत्रात असून संकेत अग्रवाल यांचे काम पाहून कमी कालावधीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
———-
प्रतिक्रिया
माझ्या कारकिर्दीच्या संपूर्ण प्रवासात मी भाग्यवान आहे. माझे अनेक मार्गदर्शक आहेत, ज्यांनी मला कायम प्रेरणा दिली आहे. तथापि,माझे वडील माझ्यासाठी खुप सपोर्टर व प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी मला नैतिकता, प्रामाणिकपणा सचोटी शिकवली आहे. ही माझ्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे मला चिकाटी, नम्रता आणि चिरस्थायी नातेसंबंध निर्माण करण्याचे कौशल्य मिळाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या, मी उद्योगातील नेत्यांकडून प्रेरणा घेतली आहे जे दूरदर्शी नेतृत्व आणि नवकल्पना शिकवतात, त्यामुळे नवनवीन आव्हाने त्यांना सोडवून रिअल इस्टेटमध्ये परिवर्तनीय बदल घडवून आणण्याची क्षमता मिळवली आहे.
संकेत अग्रवाल, असो.डायरेक्टर, मित्तल ब्रदर्स, पुणे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम