
रावेरच्या सौ. के.एस.ए. गर्ल्स हायस्कूल व सरदार जी.जी. हायस्ककूल शाळेचा दहावीचा निकाल ९० टक्के
रावेर प्रतिनिधी
*के.एस.ए. गर्ल्स हायस्कूल*
येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूल शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल ९० टक्के लागला असून शाळेतून भूमिका यशवंत दलाल ही विद्यार्थिनी ९७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.
शाळेतून २४० विद्यार्थीनी परीक्षेत बसल्या होत्या. त्यापैकी २२३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. शाळेतून प्रथम भूमिका यशवंत दलाल ९७ टक्के, द्वितिय तेजस्विनी सुनील महाजन ९६.४० टक्के तर उन्नती राजेश पाटील व महिमा महेंद्र पाटील ९६.२० टक्के गुण मिळवून दोघेही तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहे. त्यांचे रावेर शिक्षण संवर्धक संघाचे पदाधिकारी मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पुराणिक व शिक्षकांनी कौतुक केले आहे.
*सरदार जी.जी. हायस्ककूल*
येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदारजी स्कूल शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल ८९.७६ टक्के लागला. यात प्रथम तेजस योगेश महाजन यांने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांकावर ऋषिकेश अनिल चौधरी ९४.२० टक्के गुण मिळवून तर तृतीय क्रमांकावर रोहित सतीश मानकर ९३.४० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. शाळेतून २५४ पैकी २२८ (८९.७६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले, सचिव अक्षय अग्रवाल, मुख्याध्यापक आर. आर. पाटील, उपमुख्याध्यापक एन. जे. पाटील व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम