रावेरमध्ये गोडाऊन फोडले; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा...

रावेरमध्ये गोडाऊन फोडले; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

रावेर | प्रतिनिधी
रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील ‘नारायणी सेल्स’ या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

२४ ते २६ मे दरम्यान चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी कॅडबरी बॉक्स, ५ स्टार चॉकलेट बॉक्स, एक मोबाईल फोन, डीव्हीआर यंत्रणा आणि वायफाय राऊटर असा एकूण ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी उज्वल ओमप्रकाश अग्रवाल यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये घडली आहे.

या प्रकरणी अग्रवाल यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, शहरात सध्या अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम