रावेरमध्ये पंजाब नेशनल बँकेची शाखा सुरु करा – सुरेश चिंधू पाटील

शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी संघर्ष समिती तर्फे मागणी

बातमी शेअर करा...

रावेर
पंजाब नेशनल बँकेची शाखा रावेर शहरात सुरु करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधू पाटील यांनी बँकेकडे इ मेल द्वारे केली आहे.
रावेर हे तालुक्याचे शहर असून मध्यप्रदेश सीमेवरील मोठे शहर आहे. रावेर शहर व परिसरात खूप मोठमोठे केळी बागायतदार शेतकरी व व्यापारी आहेत. रावेर हे केळीचं आगार समजलं जातं. संपूर्ण देशांमध्ये सर्वात जास्त दर्जेदार केळी ही रावेरची असते.
रावेर शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आय. डी. बि. आय. बँक, जळगाव पीपल्स बँक, रावेर पीपल्स बँक, एच.डी.एफ.सी. बँक जळगाव जनता बँक, येस बँक, अॅक्सीस बँक, आय.सी.आय.सी.आय. बँक, व्यास धनवर्धिनी बँक, आय.डी.एफ.सी. बँक यांच्यासह अनेक सूक्ष्म फायनान्स बँक व संस्था आहेत.
सामान्यतः केळी खरेदी करणारे व्यापारी हे उत्तर भारतातील आहेत. व त्यांचे खाते आपल्या लोकप्रिय पंजाब नेशनल बँकेत आहे. येथील शेतक-यांनी केळी आपल्या शेतातील केळी हि व्यापारी किंवा केळी ग्रुप यांना दिली असता त्याचे पैसे हे आपल्या लोकप्रिय पंजाब नेशनल बँकेत जमा होतात. व आपली शाखा रावेर शहर हे तालुक्याचे ठिकाण असूनही येथे नसल्याने फरफटत शेतक-यांना सावदा शाखेत जावे लागते. या त्रासाला कंटाळून काही शेतक-यांनी आपले खाते हे भारतीय स्टेट बँकेत उघडून भारतीय स्टेट बँकेत पैसे पाठवावे अशी विनंती व्यापा-यांना केल्याने त्यांचे पैसे भारतीय स्टेट बँकेत येतात. व त्यांचे व्यवहार सुरळीत होत आहे.
मात्र यामुळे आपल्या बँकेचा व्यवसाय बुडत आहे तसेच ९०% शेतक-यांचे पैसे आपल्याच सावदा शाखेत येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व त्यांना हालअपेष्टा करत व आर्थिक भार सहन करत सावद्याला खेटे मारावे लागत आहे.
हि मोठी विवंचना असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
म्हणून रावेर परिसरातील शेतकऱ्यांसाठी रावेर शहरातच आपली शाखा उपलब्ध व्हावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधू पाटील यांनी बँकेकडे इ मेल द्वारे केली आहे.
निवेदनावर अॅड. जे. जी. पाटील, राजेंद्र अटकाळे, विनोद तायडे, दिलीप साबळे, किरण महाजन, योगेश महाजन, डी. डी. वाणी, शालिक महाजन, सुनील चौधरी, विलास चांदेलकर, जितेंद्र जैन, दिलीप महाजन, संदीप महाजन, केदारनाथ पाटील, दीपक चौधरी, विजय पाटील, अजय पाटील, गोकुळ धनगर, राजेंद्र महाजन, मकरंद रायमले, कैलास पाचपोहे, कल्पेश महाजन, दीपक पटेल, सुनील गोटे, जितेंद्र चौधरी, शेख मुजाहिद शेख कुतुबुद्दीन, मुकेश पाटील, शेख कयामत शेख कुतुबुद्दीन, सुरेश पाटील यांच्यासह सुमारे 30 शेतक-यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम