
रावेरला एल एंड टी फायनान्स च्या कार्यालयाचे उद्घाटन
रावेर प्रतिनिधी
येथील स्टेशन रोड वरील कॅनरा बँकेच्या वर एल एंड टी फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन ब्रांच मॅनेजर श्री. तुषार भोई सर यांच्या कडून करण्यात आले. रावेर तालुक्यात एल अँड टी फायनान्स कंपनीचे मालमत्ता तारण कर्ज, बँक ट्रान्स्फर कर्ज अश्या प्रकारचे इत्यादी कर्ज वाटप आता करण्यात येईल. या उद्घाटन प्रसंगी रावेर शाखेचे क्रेडिट मॅनेजर श्री. अमित कुलकर्णी, सेल्स मॅनेजर बाबा साळुंके, भूषण तायडे, चंद्रकांत चौधरी, योगेश कोळी, ईश्वर म्हसाने व ऑपरेशनल मॅनेजर रोहित लोहार व ग्राहक उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम