
रावेरला सोलर प्रकल्पाच्या तारासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे अटकेत
रावेरला सोलर प्रकल्पाच्या तारासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे अटकेत
रावेर: रावेर पोलिसांनी येथील सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अॅल्यूमिनीयमच्या तारासह आठ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती, अशी की येथील गट नंबर १७८३ मध्ये सोलर प्रोजेक्टरचे काम सुरू आहे. यासाठी भरत कमलाकर महाजन (रा. रावेर) यांनी प्रोजेक्टसाठी आणलेल्या १०० स्वेअर एमएम कंडक्टरच्या सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या सहा अॅल्यूमिनीयम तारांचे बंडल चोरीला गेल्याची तक्रार (ता. ८) रावेर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या पथकाने गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. मुदस्सर शेख बदरुज्जमा शेख (३६, रा. जुनेगाव चाळीत मोहल्ला, मुक्ताईनगर), सय्यद आकीब सय्यद हुसेन (२२, रा. इदगाहनगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेऊ प्राथमिक तपासात या
दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीच्या अॅल्यूमिनियमच्या तारांसह गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो (एमएच ४३ बीबी ०५८६) गाडी असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. कल्पेश आमोदकर, पो. कॉ. संभाजी बिजागरे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विकारुद्दीन शेख, चालक ग्रेड पोउपनि जमिल शेख, पोहेकों संतोष ईदा यांनी सक्रिय सहभाग घेऊन कारवाई केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम