रावेर तालुक्यात तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई : अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त

बातमी शेअर करा...

रावेर तालुक्यात तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई : अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त

परिसरात खळबळ

रावेर : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत असताना, तहसीलदार बंडू कापसे यांनी मध्यरात्री 2:30 वाजता स्वतः कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.रावेर परिसरात वाळू चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार कापसे यांनी रेल्वे स्टेशन रोड ते विटवा मार्गावर गस्त घातली. यावेळी MH-32-P-1708 क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळले. चालक प्रदीप गोपाळ पाटील (रा. ऐनपूर) याच्याकडे वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. तहसीलदारांनी तात्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात उभे केले. मालकाला दंडाची नोटीस बजावण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.तहसीलदार कापसे म्हणाले, “अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. अशा कारवायांचे सत्र यापुढेही सुरू राहील.” नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असले, तरी स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांवर लक्ष ठेवण्यात अपयशाचा ठपका ठेवला जात आहे. पर्यावरणप्रेमींनी निष्काळजी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली आहे. तहसीलदार स्वतः मैदानात उतरल्यानंतरच कारवाई यशस्वी होत असल्याने, इतर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम