रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी व्ही. ए. मेढे

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून व्ही. ए. मेढे यांनी आज पदभार स्वीकारला.
श्री. मेढे हे नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक गटविकास अधिकारी (प्रशासन) या पदावर कार्व्हीयरत होते त्यांची पदोन्नतीवर येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. आज प्रभारी गटविकास अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी के. पी. वानखेडे यांचे कडून त्यांनी पदभार स्विकारला. गेल्या आठ महिन्यां पासून गटविकास अधिकारी पदावर चार अधिकारी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार सांभाळत होते.
गटविकास अधिकारी श्री. मेढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहायक गट विकास अधिकारी के. पी. वानखेडे, अधिकारी राजेंद्र फेगडे, कृषी अधिकारी एल. ए. पाटील तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम