रावेर पोलिसांची कामगिरी ; सुमारे ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुरांची अवैध वाहतूक रोखण्यास यश

बातमी शेअर करा...

रावेर

रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र हद्दीत शेरीनाका येथे नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या विना परवाना म्हशीची वाहतुक करणारे 04 वाहनासह 33 म्हशी असा एकुण 64,50,000/- मुद्देमाल रावेर पोलिसांनी जप्त केला आहे.

दि. 15/10/2024 रोजी विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात आंदर्श आचार संहिता लागू झाल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह फैजपुर उपविभाग, व मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल रावेर पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचे सिमेवर असलेले पाल दुरक्षेत्र येथील शेरीनाका येथे पोउपनी तुषार पाटील, पोहेकाँ/1559 जगदीश लिलाधर पाटील, पो हे काँ 2818 ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पो काँ/532हमीद हमजान तडवी असे हजर राहुन ड्युटी करीत असतांना दि. 16/10/2024 रोजी पहाटे 01/30 वाजेचे सुमारास 1] आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 2) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.8936 3) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी. जी.38234) अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 वरील चालकास थांबवुन वाहनात काय आहे असे विचारले असता चालक यांनी आयशर वाहनात म्हशी आहेत असे सांगितले. म्हणून आम्ही बॅटरीचे प्रकाशात पाहीले असता प्रत्येक वाहणात म्हशींना अत्यंत निदर्यतेने दोरीने घटट बांधुन त्यांना कुठल्याही चा-यापाण्याची सोय न करता वाहनात पुरेशी जागा न ठेवता कोंबुन जखडुन बांधुन ठेवलेल्या अवस्थेत दिसुन आल्याने पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांनी सदर बाबत माहीती माहिती घेवून चारही वाहन म्हशीसह रावेर गावातील सावदा रोड लगत असलेल्या द्वारकाधीश गौशाळेसमोर आणले.  तेथे 1] आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 वरील चालक ईरफान खान हिरु खान रा.  मेवाती वय-31 रा.सारपाटा ता. अमळनेर जिल्हा जळगांव,  2) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.8936 चालक ईनायत खान काल्या खान वय-40 रा. बनखड ता. कसरावद जिल्हा खरगोन म.प्र, 3) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी. जी. 3823 चालक राजु खाँ सलीम खॉ वय-40 रा. ताजपुर ता.जि.उज्जैन म.प्र., 4) अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 चालक अली खान शरीफ खान वय-36 रा. पालसमद ता. कसरावद जि. खरगोन म..प्र. यांना ताब्यात घेण्यात आले.

दरच्या म्हशी त्याचे मालकीचे असल्याचे आरोपींनी सांगितले. परंतु म्हशी खरेदी केले बाबतचे कागदपत्र तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र/वाहतुक परवाना त्यांच्याकडे आढळून आला नाही. म्हणून आरोपीतांवर सरकार तर्फे पो काँ/532 हमीद हमजान तडवी नेम-रावेर पो स्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुरंन 487/2024 महाराष्ट्र पशु कुरता अधिनीयम कलम 11 चे (1) (ड) (ट), प्राण्यांचे वाहतुक अधिनीयम 1978 चे कलम 47,48,49 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 119, मोटार वाहन कायदा कलम 83/177, प्रमाणे गुन्हा दाखल करून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 1] 9,00,000/-रु.ची एक तपकीरी रंगाची 3114 मॉडेलची आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 अशी असलेली जु.वा. 2] 4,50,000/- रुपये किमतीच्या 09 म्हशी देशी जातीच्या लहाण शिंगे असलेले प्रत्येकी वय अंदाजे 5 ते 6 वयोवर्षाचे (प्रत्येकी 50,000) (एम एच-18 बी.झेड- 7455 मध्ये असलेले) 3] 12,50,000/- रु.कि.ची एक तपकीरी रंगाची अशोक लीलॅन्ड कंपणीची ईकोमेन्ट मॉडेलची वाहन क्र.एम. एच. 18 बी.जी.8936 अशी जुनी असलेली जु.वा 4] 4,50,000/- रुपये किमतीच्या 09 म्हशी देशी जातीच्या लहाण शिंगे असलेले प्रत्येकी वय अंदाजे 6 ते 7 वयोवर्षाचे (प्रत्येकी 50,000) (एम एच 18 बी.जी.8936 मध्ये असलेले) 5] 12,50,000/- रु.कि.ची गडद तपकीरी रंगाची अशोक लीलॅन्ड कंपनीची ईकोमेन्ट मॉडेलची वाहन एम एच 18 बी.जी.3823 अशी असलेली जु. वा 61 4,20,000/- रुपये किमतीच्या 07 म्हशी मु-हा जातीच्या वय अंदाजे 7 ते 8 वर्षे किंमतीच्या (प्रत्येकी 60,000). वाहन एम एच 18 बी. जी. 3823 मध्ये असलेले. 7) 12,50,000/- रु.कि.ची पांढऱ्या रंगाची अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 अशी असलेली जु. वा. 8] 4,80,000/- रुपये किमतीच्या 08 म्हशी मु-हा जातीच्या वय अंदाजे 8 ते 9 वर्ष किंमतीच्या (प्रत्येकी 60,000), वाहन एम पी 09 डी.जी-6644 मध्ये असलेले. असा एकूण 64,50,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह फैजपुर उपविभाग, व मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल रावेर पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली पाल दुरक्षेत्र येथील पोलिस उपनिरिक्षक तुषार पाटील, पोहेकाँ/1559 जगदीश लिलाधर पाटील, पो हे क 2818 ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पो काँ/532 हमीद हमजान तडवी यांनी केलेली असुन पुढील तपास पोहवा/1559 जगदिश पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम