रावेर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा संघनिवड समारंभ संपन्न

बातमी शेअर करा...

रावेर

सरदार जी जी स्पोर्टस् क्लब च्या वतीने दरवर्षी १६ वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी उन्हाळ्याच्या सुटीत रावेर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. स्पर्धा सुरु करण्यापूर्वी सर्व खेळाडूंची निवड केली जाते.
याबाबत अधिक वृत्त असे की, दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १६ वर्ष आतील खेळाडूंसाठी सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब तर्फे रावेर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आधी दि.16मे शुक्रवार रोजी सायंकाळी सौ. कमलाबाई एस् अग्रवाल शाळेच्या जिमखाना हॉल मध्ये संघ निवड समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले, उदघाटक देवेंद्र मिसर, प्रमुख पाहुणे म्हणून सचिव अक्षय अग्रवाल, व संचालक संतोष शेठ अग्रवाल, विकास देशमुख, तुषार मानकर, विजय लोहार उपस्थित होते.
तसेच संघ मालक म्हणून डॉ प्रवीण चौधरी (समृद्धी सुपर किंग्स), व्ही व्ही पाटील सर (इलाईट इलेवेन्स), प्रतिक पाटील (प्रभू टूर्स अँड ट्रॅव्हल्स), राकेश दीक्षित (रायझिंग दीक्षित), गणेश महाजन (शिवा कॅपिटल्स), दिवाकर प्रजापती (पैलवान योद्धा) यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब चे युवराज माळी, अजय महाजन, एम जी पाटील, हितेश सावकारे प्रतिक खराले, राम चौधरी, कृष्णा कोळी, मयूर महाजन रुद्र लहासे, तन्मय तायडे, रोहित भोई, रोहन कोळी, वैभव कोळी, प्रतिश इंगळे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम