रावेर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रल्हाद पाटील बिनविरोध

बातमी शेअर करा...
रावेर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रल्हाद पाटील बिनविरोध
उप सभापतीपदी पांडुरंग पाटील

 

प्रतिनिधी/रावेर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी प्रल्हाद पंडित पाटील तर उप सभापतीपदी पांडुरंग शिवदास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांना अविश्वासामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांवर ही निवड करण्यासाठी बाजार समितीत सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व 18 संचालक सभेला उपस्थित होते.

तत्कालीन सभापती व उपसभापतीविरुद्ध १४ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करीत तो मंजूर केला होता. यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली. यावेळी सभापती पदासाठी प्रल्हाद पाटील तर उपसभापती पदासाठी पांडुरंग पाटील यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी धर्मराज पाटील यांनी या दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी संचालक प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, डॉ राजेंद्र पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुयटे, पितांबर पाटील, सिकंदर तडवी, विलास चौधरी, पंकज पाटील,रोहित अग्रवाल, सौ मनीषा पाटील, सौ सविता पाटील माजी सभापती सचिन पाटील, माजी उपसभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील व सय्यद असगर हे उपस्थित होते. निवड झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. सचिव कमलेश पाटील यांनी निवडणूक कामी सहकार्य केले. यावेळी नवनियुक्त सभापती उप सभापतींचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी आमदार अरुण पाटील, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, डॉ केतकी पाटील, पद्माकर महाजन, राष्ट्रवादी चे सोपान पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह भाजप व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेवून शेतकरी बांधवांच्या हिताच्या योजना राबविल्या जातील. तसेच शेतकरी बांधवांना बाजार समितीच्या माध्यमातून अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भावी काळात भर दिला जाईल.

—प्रल्हाद पाटील, नवनियुक्त सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम