रावेर मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढणार : अमोल जावळे

रावेर तालुक्यात प्रचार

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांमध्ये रावेर मतदारसंघात विकासाची कामे झाली नाही. मतदारसंघ हा विकासाचे बाबतीत मागे पडला आहे.कारण एक प्रकारे निष्क्रिय आमदार आपल्याला मिळाले, परंतु विकासाचा हा अनुशेष आता आपल्याला भरून काढायचा आहे. आणि त्यासाठी महायुती तर्फे माझी उमेदवारी असून जनतेने मला संधी द्यावी मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढणे आणि वडील हरिभाऊ जावळे यांचे विकासाचे स्वप्न,त्यात माझ्या स्वप्नातील विकसित मतदार संघ आणि व्हिजन ठेऊन माझे विकासाचे प्रयत्न असणार आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा,तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांचे नेतृत्व आणि भक्कम साथ असल्याने मतदारसंघाला विकासामध्ये पुढे घेऊन जाऊ असे अमोल जावळे यांनी सांगितले.

आज ता ९ रोजी जावळे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह यावल तालुक्यातील बोरखेडा,वाघोड, बोरखेडा,वाघोदे,नवीन अजनाड जुने अजनाड, नांदूरखेडा आदी. गावांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गावोगावी लोकांनी अमोल जावळे यांचे जोरदार स्वागत आणि महिलांनी औक्षण केले. वडील स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्वप्नातील शेळगाव बरेज तर पूर्ण झाले आहे. तर त्यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेगा रिचार्ज याला माझे प्रथम प्राधान्य असणार आहे. आमदार हा आम जनतेचा प्रतिनिधी असल्याने जातीपातीमध्ये भेदभाव न मानता खऱ्या अर्थाने आम जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील सर्व समाजांना समान न्याय देण्याची माझी भूमिका राहणार आहे असे अमोल जावळे यांनी यावेळी सांगितले.

प्रचारा दरम्यान त्यांच्या सोबत. सुरेश धनके, प्रल्हाद पाटील सी.एस पाटील, श्रीकांत महाजन, चंदू भाऊ पाटील,गोपाळ नेमाडे, पि.के.महाजन, सुनील पाटील, विजुभाऊ महाजन, संजू महाजन, जितू पाटील, अमोल पाटील, महेंद्र पाटील, आशाताई सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष अतुल महाजन, अरुण शिंदे, गोपाळ चौरामले, राहुल महाजन, संतोष महाराज वाघोडकर, प्रवीण पाटील, चेतन पाटील, विजय लोहार, अहमद तडवी, सागर भारंबे, साजन चौधरी, निलेश सावळे, पवन चौधरी, उमाकांत महाजन, स्वप्नील सोनवणे यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम