
रावेर येथिल लोकन्यायालयात चौतीस खटले निकाली तर सहा लाख रुपयांची झाली वसुली
रावेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण मुंबई यांचे आदेशानुसार तर जिल्हा विधी प्राधिकरण जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली रावेर तालुका विधी सेवा समिती तर्फे रावेर तालुका वकील संघाच्या सहकार्याने ( ता. १०) में रोजी येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयच्या अध्यक्षस्थानी पॅनल प्रमुख प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. जटाळ साहेब होते तर पॅनल सदस्य म्हणून अँड. राजेश रायमळे होते. लोकन्यायालयात सातशे चोवीस कोर्टात दाखल असलेले खटले आणि कोर्टात दाखल पूर्व आठशे ऐकतीस खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. म्हणजे एकूण एक हजार पाचशे पंचावन्न खटले तडजोडीसाठी ठेवलेले होते. यापैकी चौतीस खटल्यामध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आले. तर कोर्टात दाखल खटल्यामध्ये तीन लाख एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये वसुल करण्यात आले. तर कोर्टात दाखल पूर्व खटल्यामध्ये विविध बँका, ग्रामपंचायती, बी. एस. एन. एल., म. रा. वि. मं. आदींच्या दाखल पूर्व खटल्यांमध्ये दोन लाख ऐन्शी हजार रुपये वसुल करण्यात आले. म्हणजे एकूण सहा लाख एक हजार दोनशे पन्नास रुपये वसुल करण्यात आले. यावेळी रावेर वकील संघाचे सचिव अँड. उदय सोनार, अँड. मधुसूदन चौधरी, अँड. व्ही. पी. महाजन, अँड. विपीन गडे, अँड. योगेश गजरे, अँड. सुभाष धुंदले, अँड. बी. डी. निळे, अँड. मुक्तार शेख,अँड. जगदीश महाजन, सरकारी वकील अँड. विक्रम शेळके, अँड. तुषार चौधरी, अँड. विनोद कोंघे, अँड. एल. के. शिंदे, अँड. के. बी. खान, अँड. मुजाहीद शेख, अँड. स्वप्निल सोनार, अँड. दुर्गेश लहासे, अँड. दिपक तायडे, अँड. मोहन कोचूरे, अँड.जितेंद्र प्रजापती आदी उपस्थित होते. तर न्यायालयीन कर्मचारी सहा. अधिक्षक विलास चौधरी, स्टेनो मनोहर शिंपी, वरिष्ठ लिपिक बी. के. तडवी, वरिष्ठ लिपिक दिपक डिवरे, वरिष्ठ लिपिक भारत बारी, कनिष्ठ लिपिक चेतन पवार, कनिष्ठ लिपिक भूषण महाजन, कनिष्ठ लिपिक प्रशांत पवार, कनिष्ठ लिपिक भरत बारी, कनिष्ठ लिपिक अंकुश सावदेकर, कनिष्ठ लिपिक विश्वनाथ चौधरी, कनिष्ठ लिपिक सविता खुपसे, कनिष्ठ लिपिक निखिल पाटील, बेलीफ दर्पण पाटील, शिपाई भगवान चौधरी, सतिश रावते, पॅरा लिगल व्हॅलिइंटर सुनीता डेरेकर, सतिश पाटील आदींनी सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम