रावेर येथे गोवंश मांस विक्री करणाऱ्यावर छापा : दांपत्यास अटक

रावेर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा...

रावेर

शहरातील कुरेशी मोहल्यात गोवंश मांस विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवंश मांस विक्री करणाऱ्यावर छापा टाकून घटनास्थळावरून दांपत्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे चाळीस हजार रुपये किंमतीचे २०० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.
रावेर शहरात कुरेशी मोहल्लात गोवंशाची कत्तल करुन गोमांस विक्री सुरु आहे. अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिस पथक तातडीने शहरातील कुरेशी मोहल्याकडे गेले. गुन्हे शोध पथकाने शहरातील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला असता नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७ वर्ष ) व तीचा पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा ( वय ५५ ) हे दोघी गोवंश मास विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन त्यांचे दुमजली घराच्या बाजुला लोखंडी शटर असलेल्या दुकानामध्ये हातात कुऱ्हाड व सुऱ्याने मांस कापतांना दिसुन आले. पोलिसांनी दांपत्यास ताब्यात घेतले. मात्र त्यांना मदत करणारा एक इसम हा गल्ली बोळाचा फायदा घेत पळुन गेला. या कारवाईत ४० हजार रुपये किमतीचे अंदाजे २०० किलो वजनाचे गोमास, ३०० रुपये किमतीची एक कु-हाड, ४०० रुपये किमतीचे सुरे जप्त करण्यात आले आहे . पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या समक्ष मासांचे नमुने घेण्यात आले आहेत. याबाबत पो.कॉ सचिन घुगे यांनी फिर्याद दिल्याने रावेर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ चे सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ५,५ (अ) (ब) (क) (ड) भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम३२५, ३ (५) प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी दांपत्याला अटक केली आहे
——–
यांनी ही कारवाई केली
ही कारवाई पोलिस अधिक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख ,गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचारी कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, सचिन घुगे
या पोलिस पथकाने केली. तपास पो.ना कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम