रावेर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

बातमी शेअर करा...

रावेर

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी नगराध्यक्षा दारा मो. जफर मो. डॉ. ताराचंद सावळे, दिलीप कांबळे या मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमांना माल्यार्पण करून दिप व धुप पुजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक करून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र अटकाळे, जे. व्ही. तायडे सर, कैलास भालेराव सर, लोकशाहीचे उपसंपादक दिपक नगरे, संतोष गाढे, बाळु शिरतुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेचे संचालक दशरथ घेटे, अशोक घेटे, सुर्यकांत अग्रवाल, अँड. दिपक तायडे, रघुनाथ कोंघे, सईद भाई, मनोहर गाढे, पुंडलिक कोघे, ज्ञानेश्वर अटकाळे, अनिल घेटे, नरेंद्र लोहार, संम्यक इंगळे, इकबाल अहेमद सर, पांडुरंग महाजन, सर्वजित घेटे, शे, हरूण भाई, वाय. एस. पाटील इ. व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल निलेश तायडे यांनी आभार मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम