रावेर लोकसभा क्षेत्रातील जळगाव पूर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नंदुभाऊ महाजन यांची निवड ।

बातमी शेअर करा...

रावेर लोकसभा क्षेत्रातील जळगाव पूर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नंदुभाऊ महाजन यांची निवड ।

सावदा (प्रतिनिधी) – पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने पुन्हा एकदा कार्यकुशल, संघटनप्रिय आणि सदैव जनसंपर्कात असेलेल्या अशा श्री. नंदकिशोर (नंदुभाऊ) महाजन यांच्या कार्याची दखल घेत, त्यांची स्थानिक स्वराज संस्था रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत जळगाव पूर्व “जिल्हा निवडणूक प्रमुख” म्हणून नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, या निर्णयामुळे रावेर लोकसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नंदुभाऊ महाजन यांनी यापूर्वीही पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत संघटन बळकट केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकीत पक्षाला यश मिळाले असून, ते पक्षनिष्ठा, कार्यतत्परता आणि लोकसंपर्कासाठी ओळखले जातात.
या नव्या जबाबदारीबद्दल रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांतून अभिनंदन करण्यात आले तर ही जबाबदारी आपणास पक्षाने दिली ती जबाबदारी आपण स्वीकारून या स्थानिक स्वराज्य निवडणुकात पक्षास घवघवीत यश मिळेल असे कार्य करू व जिल्ह्यात भाजपा च स्थानिक स्वराज्य निवडणुकात नंबर एकचा पक्ष राहील असा विश्वास व्यक्त केला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम