
रावेर लोकसभेसाठी शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
रावेर लोकसभेसाठी शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची (शिंदे गट) नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा नेते खा. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन इतर पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या नवीन कार्यकारिणीची घोषणा जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केली. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी या कार्यकारिणीला मान्यता दिली आहे.
प्रमुख नियुक्त्या
नव्या कार्यकारिणीतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत:
भुसावळ विधानसभा:
तालुका समन्वयक: सुभाष चौधरी
उपजिल्हा समन्वयक: नितीन देशमुख
उपतालुकाप्रमुख, भुसावळ शहर: सुरेश कोल्हे
शहर प्रमुख, वरणगाव: दुर्गेश बेदरकर
शहर संघटक, वरणगाव: राम शेटे
कुऱ्हे वराडसीम गट:
उपतालुका प्रमुख: जितेंद्र नागपुरे
उपतालुका संघटक: गणेश भुरे
विभाग प्रमुख: भास्कर कोळी
तळवेल-हतनूर गट:
उपतालुका प्रमुख: अनिल तायडे
विभाग प्रमुख: विनोद पाटील
उपविभाग प्रमुख: संभाजी पाटील
साकेगाव कंडारी गट:
विभाग प्रमुख: विक्रमसिंग राजपूत
मुक्ताईनगर विधानसभा:
सावदा शहर उपतालुका प्रमुख: श्याम अकोले
रावेर विधानसभा:
यावल शहर संघटक: डॉ. विवेक अडकमोल
रावेर तालुका उपसंघटक: रुपेश महाजन
जामनेर विधानसभा:
जामनेर शहर उपतालुका प्रमुख: कैलास माळी
या नियुक्त्यांनंतर पक्ष निरीक्षक विजय देशमुख, महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना पाटील, जिल्हा संघटक सुनील पाटील, जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित, महिला जिल्हा प्रमुख नंदा निकम, युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज राणे आणि इतर मान्यवरांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, आगामी काळात रावेर लोकसभा मतदारसंघात पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम