
रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या निवडणुकीत नवशक्ति पॅनल विजयी
रावेर प्रतिनिधी
रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या निवडणुकीत नवशक्ति पॅनलने अकरा पैकी ८ जागा मिळवून घवछवीत यश मिळवले तर प्रतिस्पर्धी सत्ताधारी गटाला ३ जागा मिळाल्या.
रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या ११ जागांसाठी येथील सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉल मध्ये प्रथम संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. या नंतर संस्थेची निवडणूक जाहिर करून उमेद्वारी अर्ज दाखल करून दुपारी तीन वाजता मतदानास सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश धनके होते. मतदान प्रक्रीयेसाठी सरदार जी. जी. हायस्कुलचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील व माजी मुख्याध्यापक शिरीष वाणी, जयंत कुलकर्णी व शिक्षकांनी सहकार्य केले. निवडणूक शांततेत झाली. एकुण १४६ सदस्यां पैकी १२९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. संचालक पदाच्या आठव्या जागे साठी विजय लोहार व डॉ. प्रेमराज पाटील यांना समान ५६ मते मिळाली. म्हणून त्यांच्यात ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात विजय लोहार विजयी झाले.
निवडून आलेले उमेद्वार व कंसात त्यांना मिळालेली मते.
अध्यक्षपदासाठी देवेंद्र श्रीकृष्ण मिसर (६५) विजयी, प्रकाश गंगाधर मुजुमदार (६१) पराभूत.
उपाध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र प्रभाकर आठवले विजयी (६८) विजयी, अशोक गणपत वाणी (६०) पराभुत.
सचिवपदासाठी अक्षय राजेंद्र अग्रवाल (६९) विजयी, विशाल नंदलाल वाणी (६०) पराभुत.
८ विजयी संचालक व कंसात त्यांना मिळालेली मते.
नवशक्ती पक्षाचे शैलेंद्र विजयकुमार देशमुख (९३), शितल रमेश पाटील (८७), महेश सुरेश अत्रे (८४), संतोष मदनलाल अग्रवाल (८०), तुषार एकनाथ मानकर (६२) हे तर सत्ताधारी पक्षाचे डॉ. दत्त प्रसाद माधव दलाल (८८), उज्वल ओम प्रकाश अग्रवाल (६०), विजय सुंदरलाल लोहार (५६) हे विजयी झाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम