रावेर विधानसभेत राजकीय वारसा जोपासणारे धनंजय चौधरी यांचाच बोलबाला
धनंजय चौधरी यांची तरुण वर्गामध्ये मोठी क्रेज, मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
रावेर / प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी सादर करणारे धनंजय चौधरी हे राजकीय वारसा असलेले एक तरुण, उमदे आणि उत्साही नेता आहेत. त्यांचे वडिल विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी
तर आजोबा लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी माजी मंत्री म्हणून महाराष्ट्रात राजकीय ठसा उमटविला आहे. त्यांचे राजकीय क्षेत्रात असलेले मोठे योगदान राहिले आहे.
लहानपणापासूनच त्यांना घरातून राजकीय संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले आहे, ज्याचा उपयोग ते समाजाच्या सेवेसाठी करत आहेत.
धनंजय चौधरी यांचा उद्देश रावेर व यावल तालुक्यातील विकासाला नवा आयाम देण्याचा आहे. विकासाच्या गंगेला या भागात आणत त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, आणि पायाभूत सुविधा
यांसारख्या मूलभूत क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पुढील काळात त्यांनी विकासकामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे वचन दिले आहे.
धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर आणि यावल तालुक्यातील जनतेला एक आशावादी भविष्य दिसत आहे. त्यांच्या वडिलांचे आणि आजोबांचे राजकीय मार्गदर्शन लाभलेला हा युवक, जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्नशील आहे.
धनंजय चौधरी यांनी वडील आमदार असतांना त्यांच्या मागे तरुणांची एक मोठी फळी उभी करीत त्यांनी तरुण फळीला सोबत घेऊन आदिवासी, गोर गरीब, गरजू लोकांसाठी पडद्यामागे राहून मोठे कार्य उभे केले आहे. त्याचे फलित म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.