राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का : वडजी-गुढे गट आणि माळी समाजाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

बातमी शेअर करा...

राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का : वडजी-गुढे गट आणि माळी समाजाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

भडगाव  – येथील वडजी-गुढे गट तसेच भडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व माळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेला शहरासह ग्रामीण भागात भक्कम ताकद मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिवसेनेत दाखल झालेल्यांमध्ये महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष दीपक संभाजी महाजन, संचालक रमेश महाजन, महात्मा फुले सेवाभावी मंडळाचे सचिव विनोद महाजन, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मुकुंदा महाजन, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज महाजन, शिंदीचे माजी सरपंच दीपक महाजन यांच्यासह प्रकाश महाजन, विजय महाजन, नंदू महाजन, रामचंद्र परदेशी, संदीप परदेशी, राकेश महाजन यांचा समावेश आहे.

या सामूहिक प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा उपसंघटक संजय पाटील, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद पाटील, शहरप्रमुख आबा चौधरी, विजयकुमार भोसले, माजी नगरसेवक जगन भोई, उपतालुकाप्रमुख संजय वेलजी पाटील, गणप्रमुख सोनू महाजन, कोळगावचे आबा महाजन, अनिल बिराडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे शरद पवार गटाला भडगाव तालुक्यात मोठे राजकीय नुकसान झाल्याचे चित्र आहे, तर शिवसेनेचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. स्थानिक राजकारणात या प्रवेशाचे दूरगामी परिणाम जाणवतील, असे जाणकारांचे मत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम