राष्ट्रहित काय असते हे राजेंनी जगाला दाखवून दिले – शिव व्याख्याते प्रमोद पाटील

अडावद येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवव्याख्यान

बातमी शेअर करा...

राष्ट्रहित काय असते हे राजेंनी जगाला दाखवून दिले – शिव व्याख्याते प्रमोद पाटील
अडावद येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवव्याख्यान

अडावद ता. चोपडा प्रतिनिधी

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वतःला झोकून दिले, समर्पण करून दिले होते. तेव्हाच एक संपन्न राष्ट्र उदयास येते. आपली बुद्धी, चातुर्य, शक्ती याचा वापर राष्ट्रासाठी करायचे असते. देशासाठी, महाराष्ट्रासाठी करायचा असतो हे जर कोणाला कळले असेल तर राजे छत्रपती शिवाजी महाराज हे होय. त्यांनी राष्ट्रहित काय असते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले.

येथे श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था अडावद संचलित शामराव येसो महाजन विद्यालय अडावद व खाजगी आदर्श प्राथमिक शाळा अडावद ता. चोपडा जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्याते प्रमोद पाटील सर (दगडीकर) यांचे शिवजन्मोत्सव सोहळा – २०२५ निमीत्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान शामराव महाजन उपाध्यक्ष वासुदेव नारायण महाजन, सचिव रमेश आनंदा पवार, सहसचिव आर. डी. माळी संचालक मुरलीधर महाजन, रफिक मण्यार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवव्याख्याते प्रमोद पाटील पुढे म्हणाले महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अवघ्या बाराव्या वर्षी प्रभुश्रीरामाचा भगवा ध्वज राजे शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर देत. माँसाहेब जिजाऊंसोबत कर्नाटकातून महाराष्ट्रात पाठवले. पहिले दहा वर्षे राजेंनी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात युद्धनीतीचे धडे घेतले. नंतर अवघ्या तीन वर्षात मोघलांच्या सातशे पन्नास वर्षांच्या अन्यायातून मुक्त करतात.

तोरणा, आंध्रप्रदेशातील श्रीशल्यमल्लिकार्जुन मंदिराचा घाट चौथे गोपुर निर्मानाचे काम, शिवा काशीद, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, हिरोजी इंदोलकर, येसाजी कंक या सर्व मावळ्यांचे इतिहासात अजरामर करणारे व्यक्तिमत्व राजे छत्रपती शिवाजी महाराज होत. जागतिक दर्जाचे चारित्र्य त्यांनी निर्माण केले. महाराष्ट्राची जगात ओळख शिवछत्रपतींच्या नावाने ओळखले जाते. सर्व जगाला माझा राजा डोक्यात घेतला परंतु महाराष्ट्राची दुर्दैवी परिस्थिती आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शा.ये.महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, एस. टी. महाजन, आर. जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी, व तर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक सी.एस.महाजन, शिपाई ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम