बातमीदार | मंगळवार दि ३० जानेवारी २०२४
श्रमसंस्कार शिबिर – राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘हिवाळी विशेष श्रम-संस्कार शिबीराचे’ उत्साहात उदघाटन
कर्जाणे आश्रमशाळेत ५ फेब्रुवारीपर्यंत ७ दिवसीय शिबीर
चोपडा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वी.प्र. देशमुख प्राथमिक आश्रमशाळा, शरच्चंद्रिका पाटील माध्यमिक आश्रम शाळा, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील उच्च माध्यमिक आश्रम शाळा कर्जाणे येथे दि. ३० जानेवारी २०२४ ते ०५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.
Also Read: राष्ट्रीय मतदार दिवस – कुरवेल हायस्कूल मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
या हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन दि.३० जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले. याप्रसंगी शिबीराचे उदघाटक भारतीय सेनेचे माजी सैनिक छगन महारू बारेला, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील
तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समिती सदस्य विवेक पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, माजी जि.प. सदस्या सौ. इंदिराताई पाटील, पीएसआय सुहासिनी बारेला, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी मंगला दीदी,
सरिता दीदी, हातेड माध्य. विद्यालयाच्या शिक्षिका व माध्यमिक पतपेढीच्या संचालिका सौ. सुनंदा साठे, कर्जाने येथील उपसरपंच प्रमोद बारेला, प्राध्यापक प्रतिनिधी एम. जी. पाटील पंकज पाटील, नरसिंग बारेला, श्री.सतीश बारेला,
जनशिक्षण संस्थेचे अधिकारी शशिकांत साळुंखे, सौ. माया शिंदे, सौ. भारती साळुंखे, शरदचंद्रिका पाटील माध्यमिक आश्रमशाळा, कर्जाणे येथील मुख्याध्यापक दिलीप सोमा सावकारे,
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. के. लभाणे, डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ. एल. बी. पटले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिबीराचे उदघाटन माजी सैनिक छगन महारू बारेला यांच्या हस्ते महात्मा गांधी,
माजी शिक्षणमंत्री कै. ना.अक्कासो. सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
या श्रमसंस्कार शिबीराचे प्रास्ताविक रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी डॉ.पी.के.लभाने यांनी केले. यावेळी त्यांनी ०७ दिवसाच्या कालावधीत केल्या जाणाऱ्या कामाचा संक्षिप्त आढावा सादर केला.
याप्रसंगी PSI सुहासिनी बारेला, ब्रह्मकुमारी मंगला दीदी, माजी जि. प.सदस्या सौ. इंदिराताई पाटील व उपसरपंच प्रमोद बारेला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आयुष्यातील त्याग आणि सेवेचे महत्व,
मनाचे आरोग्य व आरोग्याची घ्यावी लागणारी काळजी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यानी आपल्या कडील ज्ञान व कौशल्याचा वापर समजासाठी करावा असा संदेश दिला.
यावेळी सौ. इंदिराताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, समाजसेवा, श्रमसंस्कार यातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधावा. यानंतर उपसरपंच प्रमोद भाया बारेला यांनी आपल्या मनोगतातून श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून
जनसंपर्क वाढवावा तसेच स्थानिक लोकांच्या समस्या, प्रश्न समजून घ्याव्या असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या ०७ दिवसात श्रमसंस्कार शिबिरात समाजोपयोगी कार्य कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले.
तसेच महविद्यालयाने नजीकच्या काळात मिळविलेल्या यशाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. एल. भुसारे यांनी केले व आभार डॉ.सौ.के.एस.क्षीरसागर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य दिलीप सावकारे, मुख्याध्यापक रामचंद्र आखाडे, विजय शुक्ल, कल्पेश पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी आश्रम शाळा कर्जाणे येथील शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनी, विद्यार्थी, पालक व कर्जाणे येथील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम