राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; सबगव्हाण येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा...

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; सबगव्हाण येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पारोळा l प्रतिनिधी
पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सबगव्हाण येथील दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (२० ऑक्टोबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव सुरज शामदास ठाकरे (वय २५, रा. सबगव्हाण, ता. पारोळा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज ठाकरे हे सोमवारी मध्यरात्री दुचाकी (क्र. एमएच-५४ डी-६३४७)वरून प्रवास करत असताना राष्ट्रीय महामार्गावर त्यांची दुचाकी जोरदार धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर सुरज ठाकरे यांना तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सबगव्हाण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम