
राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचे जळगावात इपीएफओ कार्यालया समोर धरणे आंदोलन
राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचे जळगावात इपीएफओ कार्यालया समोर धरणे आंदोलन
खा. स्मीताताई वाघ यांना दिले निवेदन
जळगाव ;- येथील राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचा जळगावात आपल्या मागण्यासाठी दि २४ मार्च रोजी इपीएफओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
किमान पेन्शन रु ७५००+महा. भत्ता व वैद्यकीय सुविधा व इतर मागण्यासाठी अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या आदेशा नुसार दि. २४/३/२०२५ रोजी देश भर इपीएफओ कार्यालय यांचे समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आह.
जळगांव जिल्ह्यातील सर्व इपीएस९५ पेन्शनर संघटना देखिल दि २४/३/२०२५ रोजी जळगांव येथील सह. आयुक्त भविष्य निधी कार्यालय जळगांव औद्योगिक वसाहत येथील जुना गुरांचा बाजार बीएसएनएल टावर जवळ येथे सकाळीं अकरा वाजता धरणे आंदोलन करणार आहे. तरी जास्तीत जास्त जळगांव जिल्ह्यातील इपीएस ९५ पेन्शनर यांनी यावेही सहभागी व्हावे यावेळी अरविंद भारंबे अध्यक्ष जळगांव जिल्हा. रमेश नेमाडे उपाध्यक्ष जळगांव जिल्हा.संजीव खडसे ,कार्याध्यक्ष जळगांव जिल्हा. डी एन पाटील. सचिव जळगांव जिल्हा. हरी नारायण व्यवहारे. राज्य उपसचिव. मीठाराम सरोदे. भुसावळ तालुका अध्यक्ष. सूपडु भाऊ सपकाळे जामनेर तालुका अध्यक्ष. रामकृष्ण खेवलकर (गुरूजी ) यावल तालुका अध्यक्ष. नंदलाल बोदडे पाचोरा तालुका अध्यक्ष.इ मान्यवर उपस्थीत राहून पुढील मार्गदर्शन करणार आहे.तरी जास्तीत जास्त संख्येंने उपस्थीत राहावे असे आवाहन असे आवाहन ंघटनेमार्फत करण्यात आले आहे.
संघटनेच्या विविध मागण्यासाठी आज जळगावच्या खा. स्मिताताई वाघ यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी अरविंद भारंबे अध्यक्ष जळगांव जिल्हा. रमेश नेमाडे उपाध्यक्ष जळगांव जिल्हा.संजीव खडसे ,कार्याध्यक्ष जळगांव जिल्हा. डी एन पाटील. सचिव जळगांव जिल्हा.इ पदाधिकारी उपस्थीत होते. चर्चा करतांना खा. स्मिताताई यांनी संघटनेच्या मागण्या व मागील सर्व इतिहास जाणून घेत या प्रश्नाबाबत संसदेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन पदाधिका—यांना दिले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम