
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात
विविध समाजोपयोगी उपक्रम
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात
विविध समाजोपयोगी उपक्रम
जळगाव प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जळगाव विभागाचे समन्वयक श्री. राजू गवारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगावचे संचालक डॉ. बी. व्ही. पवार होते. समारोप सोहळ्यात बोलताना प्रमुख अतिथी श्री. गवारे यांनी युवकांनी समाजसेवेचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.यावेळी शिबीरात सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून कु.सौरभ सुनिल माळी यांस गौरविण्यात आले.त्यावेळी त्यांनी आपले विद्यार्थी मनोगत मांडले.
या शिबिरात 06 मार्च ते 12 मार्च 2025 दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यात स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, पर्यावरण संरक्षण उपक्रम आणि गावातील गरजूंसाठी मदतकार्य यांचा समावेश होता. तसेच ‘एक मूठ धान्य संकलन’, सर्वेक्षण, क्षेत्रभेट, रात्र आकाश दर्शन यासारखे उपक्रमही पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक कु. प्रतीक साळी यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी NSS कार्यक्रम अधिकारी श्री. एस. एन. खान, विद्यार्थी विकास अधिकारी श्री. प्रकाश बारी, शिबिर प्रमुख श्रीमती गीता सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपाली पाटील, डॉ. धनश्री चौधरी आणि सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम