
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अमळनेर येथे विजयादशमी पथसंचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अमळनेर येथे विजयादशमी पथसंचलन
अमळनेर प्रतिनिधी I राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त संघाद्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यात गुरुवारी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य पथसंचलन संपन्न झाले.
पथसंचलनाचा मार्ग आणि सहभाग
सकाळी ८:०० वाजता म्हसकर प्लॉट येथून सुरू झालेले हे पथसंचलन नेताजी सुभाष चौक, तिरंगा चौक, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक, स्टेशन रोड मार्गे पुन्हा म्हसकर प्लॉट येथे समारोप झाले. यावेळी गणवेशात ३०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते, तसेच मंगलवेशात अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. संचलन मार्गात स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आणि फटाके फोडून उत्साहपूर्ण स्वागत केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे करताना हा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरला. संघाच्या मूल्यांचा आणि सामाजिक कार्याचा प्रसार करणाऱ्या या पथसंचलनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम