राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत खेळाडू आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक
रांची येथे ६८वी राष्ट्रीय शालेय ट्रॅक सायकलिंग स्पर्धा
राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत खेळाडू आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक
रांची येथे ६८वी राष्ट्रीय शालेय ट्रॅक सायकलिंग स्पर्धा
जळगाव प्रतिनिधी
नुकत्याच रांची (झारखंड) येथे 17 ते २१ जानेवारी दरम्यान झालेल्या ६८वी राष्ट्रीय शालेय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत बाहेती महाविद्यालयातील खेळाडू आकांक्षा म्हेत्रे हिने दोन सुवर्णपदक पटकविले आहे.
या स्पर्धेत १९ वर्षोखालील मुलींच्या वयोगटात टिम स्प्रिंट या प्रकारात ५६.५५ व ५०० मीटर टाईम ट्रायल प्रकारात ४०.६७ हा वेळ नोंदवून दोन्ही सायकलिंग प्रकारात प्रथम क्रमांक पटकविले. व आकांक्षाने १९ वर्षे मुलींच्या वयोगटात १०७ पॉईंट मिळविले व बेस्ट राईडर हा अवॅार्ड मिळविला. अवॉर्ड मिळविणारी आकांक्षा महाराष्ट्रातील पहिली खेळाडु आहे.
आकांक्षाला प्रशिक्षक सागर सोनवण यांचे मार्गदर्शन लाभले. तीच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे बाहेती महाविद्यालयातील प्राचार्य डॅा.अनिल लोहार उपप्राचार्य सोनवणे व क्रीडा शिक्षक हरीष शेळके यांनी कौतुक केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम