रासेयो हिवाळी शिबिराचे १ ते ७ फेब्रुवारी कालावधीत आयोजन

कढोली या गावात ग्रामस्वच्छता ; मान्यवरांचे व्याख्यानाचे आयोजन

बातमी शेअर करा...

रासेयो हिवाळी शिबिराचे १ ते ७ फेब्रुवारी कालावधीत आयोजन

कढोली या गावात ग्रामस्वच्छता ; मान्यवरांचे व्याख्यानाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा, राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने दि. १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनात उद्या शनिवारी सकाळी ११.३० वाजता कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते हिवाळी शिबिराचे उद्घाटन होणार आहे. व्य. प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती असणार आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी कढोली या गावात ग्रामस्वच्छता करण्यात येणार आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ, डॉ. व्ही.एम. रोकडे यांचे व्याख्यान होईल, दि. ४ फेब्रुवारी रोजी पोलिस उपिनिरीक्षक दिगंबर थोरात, डॉ. मनिषा इंदाणी यांचे व्याख्यान होणार आहे. दि. ५ व ६ फेब्रुवारी रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ योगा ॲण्ड मॅनेजमेंटच्या कविता कपूर व श्रीबालसेर यांचे मेडिटेशनवर व्याख्यान होईल. दि. ७ फेब्रुवारी रोजी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. अशी माहिती कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास दांडगे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. पद्माकर चव्हाण, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. स्नेहलता शिरूडे यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम