राहत्या घरी गळफास घेत प्रौढाने संपविले जीवन 

बातमी शेअर करा...

राहत्या घरी गळफास घेत प्रौढाने संपविले जीवन 

जळगाव शहरातील समता नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या प्रौढाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२२ मे) सकाळी उघडकीस आली. ईश्वर सुखदेव वाघ (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ईश्वर वाघ हे पत्नी, एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी यांच्यासह समता नगरमध्ये राहत होते. ते भंगार व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंब झोपले, मात्र सकाळी उठल्यानंतर ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने वाघ कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम