रिक्षाचालकाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त!

शनीपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; नेरी नाका परिसरात सापळा रचून अटक

बातमी शेअर करा...

रिक्षाचालकाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त!
शनीपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; नेरी नाका परिसरात सापळा रचून अटक

जळगाव प्रतिनिधी
शहरातील शनीपेठ पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत मोठी यशस्वी कारवाई केली. २८ मार्च रोजी दुपारी नेरी नाका परिसरात एका रिक्षाचालकाकडून देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधिक सतर्क झाले असून, या दक्षतेच्या मोहिमेंतर्गत ही कारवाई पार पडली.

शहराचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार शहरात गस्त व नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. त्याच दरम्यान, शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक विशेष सापळा रचण्यात आला.

गोपनीय माहितीनुसार, एक संशयित रिक्षाचालक जळगाव शहरात देशी कट्टा घेऊन येणार असल्याचे निदर्शनास आले. २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता नेरी नाका येथे सापळा लावून MH19CW6108 या क्रमांकाच्या रिक्षाची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान, रिक्षाचालक राहुल रंगराव पाटील (वय ३२, रा. कुसुंबा, गणपतीनगर, जळगाव) याच्याकडे लोखंडी बनावटीचा देशी कट्टा आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोलीस शिपाई विकी इंगळे आणि रविंद्र साबळे यांनी केली.

शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही कारवाई नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करणारी ठरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम