रिक्षात बसलेल्या महिलेचे तीन अज्ञात महिलांनी केले ४० हजार लंपास

बातमी शेअर करा...

रिक्षात बसलेल्या महिलेचे तीन अज्ञात महिलांनी केले ४० हजार लंपास

भुसावळ: तालुक्यातील वेल्हाळा येथील एका गृहिणीची रिक्षामधून ४० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ज्योती छगन पाटील यांनी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये तीन अज्ञात महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ज्योती छगन पाटील (वय ५०, रा. वेल्हाळा) या २६ ऑगस्ट रोजी वरणगावच्या मंगळवार बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी ३ वाजता त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ४० हजार रुपये काढले आणि काही औषधे खरेदी केली. त्यानंतर वेल्हाळा येथे परत जाण्यासाठी त्या वसंत सुरवाडे यांच्या रिक्षात बसल्या. रिक्षात त्यांच्यासोबत आणखी तीन महिला होत्या.

रिक्षा थोडी पुढे गेल्यावर, त्या महिलांनी रिक्षाचालकाला त्यांची बाजाराची पिशवी दुकानात राहिल्याचे सांगितले आणि मराठा समाज मंदिरासमोर त्या उतरून गेल्या. ज्योती पाटील घरी पोहोचल्यावर, त्यांच्या पर्समधून पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रिक्षातील त्या तीन महिलांवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी आता बाजारपेठेतील आणि बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुभाष सपकाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम