
रिपाइंतर्फे यावलचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे स्वागत
रिपाइंतर्फे यावलचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे स्वागत
यावल (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) यावल तालुका कार्यकारिणीतर्फे नव्याने यावल पोलीस निरीक्षकपदी रुजू झालेले रंगनाथ धारबळे यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र चिटणीस मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन रावेर-यावल विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर व यावल तालुका अध्यक्ष अरुण गजरे यांनी केले होते. या वेळी माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुयोग पातुडे, कमलाकर जाधव, सिद्धार्थ बोरेकर, नितीन बोरेकर, महेंद्र सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्वागत प्रसंगी श्री. धारबळे यांनी रिपाइं पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, “यावल शहरात कायदा व सुव्यवस्थेचा सन्मान राखण्यासाठी पोलिस विभाग सतत सज्ज राहील,” असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन संयोजक सिद्धार्थ बोरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कमलाकर जाधव यांनी केले.
कार्यक्रमाला अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली ., या स्वागत समारंभामुळे पोलीस व नागरिकांमध्ये परस्पर विश्वास आणि सौहार्द वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम