रुईखेडा येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा...

रुईखेडा येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा गावात एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाल्यामुळे एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

 

मयत शेतकऱ्याचे नाव एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१) असे असून, ते रुईखेडा गावाचे रहिवासी होते. बटाईने घेतलेल्या शेतात ते नेहमीप्रमाणे काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अचानक जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने त्यांना तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जीव गेला.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी एकनाथ कांदले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये विजेच्या धक्क्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

या घटनेची माहिती मयत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यानुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम