सावदा येथे अग्निशमन दलाच्या रॅपीड बुलेटचे लोकार्पण
आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
सावदा येथे अग्निशमन दलाच्या रॅपीड बुलेटचे लोकार्पण
आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
सावदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचे उपक्रमा अंतर्गत अग्निशमन दलासाठी अडचणीचे ठिकाणी आग विझविण्यासाठी रॅपीड बुलेट देण्यात येत असून सदर बुलेट सावदा येथे आ. चंद्रकांत पाटील व मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे प्रयत्नाने मिळाली. रॅपीड बुलेटचे
या रॅपीड बुलेट चे लोकार्पण दि. 26 रोजी नगरपालिकेत करण्यात आले. सदर रॅपीड बुलेट ची नारळ वाढऊन लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक फिरोज खान, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सूरज (बद्री) परदेशी, तसेच निलेश खाचणे,
युवा सेना शहर प्रमुख शिंदे गट मनीष भंगाळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, गौरव भंगाळे, गणेश माळी, नगर पालिकेचे अग्निशमन दलाचे अविनाश पाटील, तसेच विमलेश जैन, हमीद तडवी,सतिष पाटील, अरुण ठोसरे, मोरे, यांचेसह नागरिक उपस्थित होते. रॅपीड बुलेटचे
या रॅपीड बुलेट मुळे अडचणीचे ठिकाणी आग विझविण्यासाठी जातांना अडचण दूर होणार असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
दरम्यान सदर लोकार्पणा वेळी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी या दरम्यान माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी सदर रॅपीड बुलेट ची गन हातात घेऊन नगर पालिके बाहेर असलेली घाण स्वतः त्याव्दारे स्वच्छ केली व हा प्रात्यक्षिकाचा सदउपयोग यावेळी केला.
हे हि वाचा👇
“तासखेड्याच्या महिलांनी दारूबंदी साठी कसली कंबर सावदा पो .स्टे. ला आक्रोश मोर्चा
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम