रेड रिबन क्लबची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला सदिच्छा भेट
विविध उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी
रेड रिबन क्लबची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला सदिच्छा भेट
विविध उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी
धरणगाव I प्रतिनिधी
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रेड रिबन क्लब कार्यरत आहे. शैक्षणिक वर्षांमध्ये रेड रिबन क्लब द्वारे आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जातात यामध्ये विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी, जागतिक एड्स दिनानिमित्त बद्दल जनजागृती, आंतरराष्ट्रीय युवा दिन असे विविध उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी होतात. या अंतर्गतच दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेतील रेड रिबन क्लबचे सदस्य धरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील सोयीसुविधा त्याचा धरणगाव पंचक्रोशीतील नागरिक कशा पद्धतीने उपभोग घेतात .
तसेच सदर भेटी दरम्यान त्यांना संपूर्ण रुग्णालया संदर्भात विभागाची माहिती तसेच प्रत्येक विभाग कामकाज सबंधि सविस्तर माहिती मार्गदर्शन आय सी टी सी विभागा संदर्भात सम्पूर्ण माहिती समुपदेशक श्री. ज्ञानेश्वर शिंपी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्री राजेश्वर काकडे यांनी केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजीत जोशी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. गौरव महाजन, रेड रिबन क्लब प्रमुख भरत खैरनार यांचे हे सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम