
रेडियो मनभावनवर जेष्ठ नागरिकांपर्यंत “अटल वयो अभ्युदय योजना”
नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था ‘जेष्ठ नागरिक मंडळ’ च्या वयोवृद्धांची उपस्थिती
रेडियो मनभावनवर जेष्ठ नागरिकांपर्यंत “अटल वयो अभ्युदय योजना”
नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था ‘जेष्ठ नागरिक मंडळ’ च्या वयोवृद्धांची उपस्थिती
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था ‘जेष्ठ नागरिक मंडळ’ यांच्या २०- २५ वयोवृद्ध महिलांच्या उपस्थितीत अटल वयो अभ्युदय योजनेबद्दल कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना ,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “आमचे जेष्ठ ,आमचा अभिमान “ या अभियानंतर्गत अटल वयो अभ्युदय योजने बद्दल जिल्हयाभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ. एम.च्या माध्यमातून पुढील चार महीने राबविण्यात येत असून अटल वयो अभ्युदय योजने सोबतच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येत असल्याचे रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी संदीप केदार,आरजे शुभांगी बडगुजर, नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष मनीषा पाटील ,वंदना मंदावले,ज्योती राणे,हर्षा गुजराथी,रेणुका हिंगु,मरियम बुगद्वाला,किमया पाटील,शिल्पा बायस,हर्षाली तिवारी,वंदना मंडवारे आणि आशालता राणे यांचेसह नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी रेडियो मनभावनने प्रस्तुत केलेली संवाद नाटिका श्रोत्यांना एेकवण्यात आली. वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या टोल फ्री नंबर 14567 या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तात्काळ सोडवण्यात येईल तसेच बोलण्यासाठी ,संवाद साधण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी राहुल पाटील,साहिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम