
रेल्वेखाली उडी मारून प्रौढाचा मृत्यू, मृताची ओळख पटली
रेल्वेखाली उडी मारून प्रौढाचा मृत्यू, मृताची ओळख पटली
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील असोदा रेल्वे उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री धावत्या रेल्वेखाली उडी मारून एका प्रौढाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती; मात्र बुधवारी सकाळी तो वाल्मीक नगरातील रहिवासी ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय ५५) असल्याचे स्पष्ट झाले.
ज्ञानेश्वर पाटील हे पत्नी व दोन मुलांसह वाल्मीक नगरात वास्तव्यास होते. ते रिक्षा चालवून आणि खाजगी कंपनीत काम करून उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी रात्री घरच्यांना काही न सांगता ते बाहेर पडले आणि नंतर त्यांचा मृतदेह रेल्वेखाली सापडला.
या घटनेची नोंद शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन मृताची ओळख पटवली. सकाळी ११ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम