
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
रावेर प्रतिनिधी
रेल्वेची धडक लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री तालुक्यातील वाघोड शिवारात घडली . या बाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
या बाबतचे वृत्त असे की काल शुक्रवार रात्री वामन सहादू इंगळे (वय ६०) रा. खानापूर यास रेल्वेची धडक बसल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला . ही घटना वाघोड शिवारातील खंबा क्रमांक ४८७/०६ ते ४८७/०८ दरम्यान रात्री नऊ वाजेच्या सुमारास डाऊन लाईनला घडली या बाबत रेल्वे कर्मचारी बलराम परशुराम मिना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल विजय चौधरी करीत आहेत .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम