रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना बेड्या !

साडेचार लाखांची रोकड जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची करवाई

बातमी शेअर करा...

रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना बेड्या !

साडेचार लाखांची रोकड जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची करवाई

जळगाव प्रतिनिधी : गोपनीय माहितीच्या आधारे जी.एस. ग्राऊंड परिसरात छापा टाकून ४,५०,०००/- रुपये रोख आणि विनानंबर मोटारसायकलसह चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत रावेर रेल्वे स्टेशनवरील दरोड्याच्या गुन्ह्याची उकल झाली असून, फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, १८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना जी.एस. ग्राऊंड परिसरात काही संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, पोलीस कॉन्स्टेबल बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी जाऊन चार संशयितांना विनानंबर हिरो स्प्लेंडर मोटारसायकलवर पिशवी लटकवलेली आढळली. संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

तपासणीत मोटारसायकलवरील पिशवीत रोख रक्कम आढळली. संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. यावेळी त्यांनी आपली नावे किरण पंडीत हिवरे (वय ३२, रा. भातखेडा, ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (वय २५, रा. खिडर्डी, ता. रावेर), हरीष अनिल रायपुरे (वय २५, रा. प्रतापपुरा, बरहाणपुर, म.प्र.), आणि गोकुळ श्रावण भालेराव (वय २७, रा. डांभुर्णी, ता. यावल) अशी सांगितली.

हरीष रायपुरे याने तपासात कबुली दिली की, दि. ९/०९/२०२५ रोजी त्याने किरण हिवरे, अजय कोचुरे, गोकुळ भालेराव आणि संदीप उर्फ आप्पा शामराव कोळी (रा. डांभुर्णी, ता. यावल, फरार) यांच्यासह संगनमताने कामयानी रेल्वेत रावेर रेल्वे स्टेशनवर प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बरहाणपुर, म.प्र.) याला डोक्यात मारून त्याच्याकडील ४,५०,०००/- रुपये रोख असलेली पिशवी हिसकावली. त्यानंतर ते रावेर स्टेशनवरून पळून गेले आणि पैशांचे वाटप करण्यासाठी जळगावात एकत्र जमले होते.

पोलिसांनी लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ येथील अभिलेख तपासले असता, सुधाकर पटेल यांच्या फिर्यादीवरून सीसीटीएनएस क्र. ४५२/२०२५, भा.दं.वि. ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने ४,५०,०००/- रुपये रोख आणि विनानंबर मोटारसायकल असा १००% मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी आणि मुद्देमाल भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, पोलीस कॉन्स्टेबल बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम, तसेच तांत्रिक सहाय्यक पोलीस शिपाई गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम