
रेल्वे प्रवाशाचे हरवलेले दागिने, लॅपटॉप, पैसे केले परत
रेल्वे प्रवाशाचे हरवलेले दागिने, लॅपटॉप, पैसे केले परत
भुसावळ : भुसावळ येथील आरपीएफ पथकाने ऑपरेशन अमानत अंतर्गत हरवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एका महिला प्रवाशाला परत केली. अंदाजे ७० हजार किमतीचे दागिने आणि ७२० रूपये रोख असा हा मुद्देमाल होता.
२१ मे रोजी भुसावळ स्थानकावर आरपीएफ ठाण्यात रेल मदतद्वारे एका प्रवाशाच्या हरवलेल्या बॅगेची माहिती मिळाली. भाविका राहुल दामगोडे (वय ३५, नवापाडा, शेलवली मनोर रोड, ठाणे) असे प्रवासी महिलेचे नाव आहे. पुणे स्थानकावर उतरताना त्या आपली बॅग झेलम एक्स्प्रेसच्या (११०७७) जनरल कोचमध्ये विसरल्या होत्या. गाडी भुसावळ येताच आरपीएफ संतोष खेडेकर आणि अवधेश कुमार यांनी प्रवाशाने सांगितलेल्या डब्यात तपासणी केली. त्यावेळी बॅग तेथे मिळाली. ही बॅग महिला प्रवाशाला व्हिडिओ कॉलद्वारे दाखवली. शनिवारी ३१ मे रोजी सहायक निरीक्षक ओ.पी. मीना यांच्या उपस्थितीत बॅग प्रवासी दामगोडे यांच्याकडे सोपवली. तसेच लॅपटॉप आणि ट्रॉली बॅग प्रवाशाची काळी बॅग अॅस्सू कंपनीचा लॅपटॉप आणि आकाशी निळ्या रंगाची ट्रॉली बॅग ट्रेन क्रमाक १३२०२ पटना जनता एक्सप्रेस डाऊन कोच इ / ३ मध्ये मागे राहली होती. माहिती मिळाल्यावर प्लॅटफॉर्म क्रंमाकावर ट्रेन आल्यावर भुसावळ स्टेशचे पोलिस के. एस. वसावे, नरेंद्र गौतम यांनी डब्यात जाऊन बेवारस पडलेले सामान शोधून प्रवाशांना सामन परत दिले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम